असे काही क्रिकेटर ज्यांनी पूर्ण कारकिर्दीत कधीही टाकला नाही नो बॉल….!

0

ब्रिटाशांनी शोधलेला क्रिकेट हा खेळ भारतात चांगलाच रुजला. जंटलमन लोकांचा हा खेळ जगातील अनेक देश खेळतात. परंतु भारताइतकी क्रिकेट लोकप्रियता जगाच्या पाठीवर कुठेही बघावयास मिळत नाही. क्रिकेटचा सामना टेस्ट सिरीजपासून सुरू होऊन सध्या २० २० पर्यंत उत्कंठावर्धक झाला आहे. क्षणागणिक उत्सुकता वाढवणारा हा खेळ एखाद्या रन किंवा बॉलमुळे सामन्याच चित्र बदलतो. एखादा वाईड बॉल किंवा नो बॉल बॅट्मनना एक बाॅल जास्त खेळण्याची संधी देतो. सद्यस्थितीत बदललेल्या नियमांनुसार नो बॉलवर फ्रि हिट दिली जाते. परंतु क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात हा नियम नव्हता. तरीही बॉलींग करणार्या अनेक दिग्गज खेळाडुंनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दित कधीही नो बॉल टाकला नाही. कोण आहेत ते खेळाडू चला पाहुया.

१) डेनिस लिली – टेस्ट मॅच प्रेमींना या आॅस्ट्रेलियन खेळाडुची शैली खूपच आवडत असे. अत्यंत अचूक मारा करणारे बॉलर म्हणून ते प्रसिध्द होते. तर या डेनिस लिलीनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दित कधीही नो बॉल टाकला नाही.

२) इयान बोथॅम – इंग्लीश क्रिकेटर इयान बोथॅम यांनी १६ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दित कधीही नो बॉल टाकला नाही. इंग्लंड क्रिकेट टिमसाठी त्यांनी अनेक महत्वाच्या विकेट घेतलेल्या आहेत.

३) लांस गिब्स – वेस्ट इंडीज टिमकडून खेळणारे आॅल राऊंडर लांस गिब्स यांनी त्यांच्या कारकिर्दित ७९ कसोटी सामने आणि ३ एकदिवसीय सामने खेळले व एकूण ३०० गडी बाद केले. परंतु कधीही नो बॉल टाकला नाही.

४) कपिल देव – भारतीय संघाला पहिला विश्वचषक जिंकून देणारा रफ अँड टफ क्रिकेटर कपिल देव यांनी कधीही नो बॉल टाकला नाही.

५) इम्रान खान – सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान असणारे क्रिकेटर इम्रान खान यांनी त्यांच्या टिमच विश्वचषक सामन्यात नेतृत्व केल होत, त्यांनीही त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत नो बॉल टाकला नाही.

मित्रांनो ही माहिती आवडल्यास आमच्या पेजला लाईक करा. लेख स्नेहिजनात शेअर करा.

Leave A Reply

Your email address will not be published.