तर आम्हीच रुग्णांच्या नातेवाइकांना सुजय विखे पाटील यांचा नंबर इंजेक्शन मिळवण्यासाठी दिला असता – जयंत पाटील

0

खा. सुजय विखे यांनी विमानातून इंजेक्शन आणल्या वरून चांगलेच राजकारण पेटले आहे. नेमके इंजेक्शन चे काय झाले असे प्रश्न सुद्धा उपस्थित केले जात आहेत. तसेच औरंगाबाद उच्च न्यायालयाने सुद्धा यावर दखल घेत चौकशी चे आदेश दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज या विषयावर वक्तव्य केले आहे. “आम्हाला आधी कळालं असतं तर रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी आम्ही रुग्णालयांना सुजय विखे-पाटील यांचाच नंबर दिला असता, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. सुजय विखे यांनी केलेला व्हिडिओ त्यांच्या चांगलाच अंगलोट आल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात समाज माध्यमांवर नागरिकांच्या वेगळया वेगळया प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत

तसेच जयंत पाटील पुढे म्हणाले लोकप्रतिनिधींच जर इंजेक्शन्स घेऊन बसायला लागले आणि त्यांचे वाटप करत असतील तर वैद्यकीय यंत्रणांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळण्यात अडथळे येतील. या गोष्टीवर मत व्यक्त करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले!

खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.