“म्हणून कारने आत्महत्या केली”, जितेंद्र आव्हाडांनी मोदी सरकारला लावला टोला!

0

मुंबईमध्ये कार बुडाल्याची घटना सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल झाली आहे. ही कार पार्किंग मध्ये उभा केली होती ही कार बुडत असताना, नशीब बलवत्तर म्हणून या कारमध्ये कोणीही नव्हते. प्रथम या गाडीचा पुढील भाग बुडाला, आणि नंतर ही गाडी पूर्णपणे बुडाली. ही कार पंकज मेहता यांची असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या गोष्टीवरून चांगलेच राजकारण पेटले आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडिया वर पोस्ट करत जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदींना मजेशीर ट्विट करून टोला लगावला आहे. देशात पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. देशातील जनता महागाईने त्रस्त झाली आहे. इंधन दरवाढीच्या मु्द्द्यावर बोट ठेवत आव्हाड यांनी सरकारला टोला लगावला. “इंधनाचे दर वाढत असल्याने कारने आत्महत्या केली,” असं एकाच वाक्यात भाष्य करत आव्हाड यांनी खोचक टीका केली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.