
“…तर दिल्लीत कोणीही विचारणार नाही; शरद पवारांनी दिलेला ‘तो’ सल्ला कायम लक्षात ठेवते”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे राजकारणात फार सक्रिय असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला खासदार सुप्रिया सुळे यांची ओळख महाराष्ट्रात नाहीतर देशभरामध्ये त्यांच्या जबरदस्त कामाच्या जोरावर आहे. संसदेमध्ये महत्वपूर्ण प्रश्न विचारून त्यांनी सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांना उत्कृष्ट संसदपटू या सन्मानाने सुद्धा गौरविण्यात आले आहे.
एका वेबीनार मध्ये बोलत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की “जेव्हा मी बारामती मतदारसंघातून निवडून आले होते त्यानंतर बाबांनी मला चांगला सल्ला दिला होता. एकतर माझे वडील शरद पवार आणि आई प्रतिभा हे खूप कमी सल्ले देतात पण त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या आहेत. मी संसदेची पहिल्यांदा पायरी चढले ती पायरी चढण्याची भाग्य तुला लाभलं ही संधी बारामतीच्या लोकांमुळे मिळाली आहे. ज्यावेळी तू या बारामतीकरांना विसरशील तेव्हा त्यादिवशी तुला ती पायरी चढता येणार नाही असा सल्ला बाबांनी मला दिला होता ते मी कायम लक्षात ठेवते अशी आठवण सुप्रिया सुळेंनी सांगितली.
प्रामाणिक हेतूने काम करत खा. सुप्रियाताई सुळे फारच तळमळीने महाराष्ट्रातील प्रश्न संसदेत मांडत असतात. त्यांच्या कार्याची दखल देशभरा मधून घेतली जाते. त्या सोशल मीडियावरती सुद्धा फार ऍक्टीव्ह असतात. त्यांनी कोरोना च्या काळात कालावधीमध्ये कित्येक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मिळवून दिली आहे.