कोरोना नियंत्रणासाठी आमदारांना दिला जाणारा तब्बल इतका निधी!

0

कोरोनाची परिस्थिती भयंकर होत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थिती मध्ये राज्य सरकारने यावर मात करण्यासाठी कंबर कसली असल्याचे दिसून येते आहे. लोकांसाठी मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांची कसलीही गैरसोय होता कामा नये अशी भूमिका राज्य सरकार घेताना दिसून येत आहे.

पुण्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा आढावा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला. या आढव्या नंतर माहिती देत असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. प्रत्येक मतदारसंघात कारोना वरती मात करण्यासाठी तथा त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

तसेच “कोरोना वरती नियंत्रण उपाययोजनांसाठी आमदार निधीतून एक कोटी रक्कम खर्च करण्यास राज्य शासन मंजुरी देणार आहे”. जेणेकरून कोरोनावर मात करण्यासाठी युद्ध जन्य परिस्थितीमध्ये सुद्धा अजून सकारात्मक दृष्ट्या काम करता येईल. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक मतदारसंघात लोकप्रतिनिधींना कोरोना संदर्भात काम करता यावे; जनतेला तत्काळ सुविधा मिळावी म्हणून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.