शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन 17,982 फूट उंचीवर जाऊन तिरंगा फडकवला, स्मिता घुगेने देशाची मान उंचावली

0

पुणे : धनकवडी येथील गिर्यारोहक स्मिता घुगेने राष्ट्रकुलला शोभेल अशी कामगिरी करत लडाखमधील ‘खरदुंगला पास’ येथे 17,982 फूट उंचीवर ७५ फूटी तिरंगा फडकवून आगळा विक्रम केला. 360 एक्सप्लोररचे गिर्यारोहक आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिता हीने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सोबत घेऊन तिरांगा फडकावला, इतकेच नाही तर या अतिउंच ठिकाणी भारतीय राज्य घटनेच्या प्रस्ताविकेचे वाचन केले.

धनकवडीच्या गिर्यारोहक स्मिता दुर्गादास घुगे हिने १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी सहा वाजता जम्मू आणि काश्मीरच्या लडाख जिल्ह्यातील खरदुंगला पास या 17,982 फूट उंचीच्या जगातील सर्वात उंच मोटरेबल पासवर 75 फुटी तिरंगा फडकवला. ही कामगिरी बजावताना स्मिता हिने आपल्यासोबत महाराष्ट्राचे स्फुर्तीदैवत शिवरायांची मूर्ती सोबत नेली होती. या मूर्तीच्या साक्षीने तीने तिरंगा फडकवला; तसेच भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेचे वाचन करत खरदुंगला पास येथे अत्यंत आगळ्या पद्धतीने भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा केला.

“देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खरदुंगला पास येथे 75फुटी तिरंगा फडकवण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता. अत्यंत प्रतिकूल वातावरणाला तोंड देत मी हे साध्य करू शकले कारण शिवरायांची प्रेरणा माझ्या मनात सदैव जागृत होती. मार्गदर्शक आनंद बनसोडे व महाराष्ट्रातील तमाम जनतेचा पाठिंबा आणि माझ्या कुटुंबाची साथ मिळाल्यामुळे मी हे यश मिळवू शकले. माझे हे यश मी महाराजांना समर्पित करत असल्याची भावना घुगे हिने व्यक्त केली आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.