
भावाच्या आवाहनाला बहिणीचा प्रतिसाद!
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होते आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. अजित पवारांच्या आदेशाचे गांभीर्य लक्षात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढील दोन आठवड्यासाठी आपले सर्व राजकीय दौरे, कार्यक्रम रद्द केले असून ऑनलाईन पद्धतीने बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.
व्यक्तिशः आपण मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश कार्यालय याठिकाणी उपस्थित असणार आहोत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ व राज्यातील नागरिकांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले.