गायिका वैशाली माडे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

0

प्रसिद्ध गायिका वैशाली माडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून त्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात 31 मार्च रोजी दुपारी 12 वाजता पार पडणार आहे.यावेळी राष्ट्रवादीचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट,कला,साहित्य आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.

वैशाली माडे यांचा गायिका होण्याचा प्रवास अत्यंत संघर्षपूर्ण राहिलेला आहे.त्यांचा जन्म कमावती जिल्ह्यातील खार तळेगाव येथे झाला असून त्यांच माहेरी नाव वैशाली भैसने,त्यांच बालपण अत्यंत गरिबीत व हाल अपेष्टात गेल.याही परिस्थितीत त्यांनी गाण्याची जिद्द कायम ठेवली.पुढे त्यांच लग्न वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे अनंत मांडे यांच्याशी झाल.

 

वैशाली माडे या 2008 मध्ये झी मराठी वाहिनीवरील सारेगमप पर्वाच्या विजेत्या ठरल्या होत्या.त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितल नाही.गेल्या दशकभरात अनेक हिंदी मराठी चित्रपटात त्यांनी गाणी गायल4 आहेत.तसेच अनेक मराठी मालिकांची टायटल साँग त्या गायलेल्या आहेत.कुलवधू,होणार सुन मी या घरची, माझ्या नवर्याची बायको ही त्याची काही ठळक उदाहरण आहेत. दरम्यान वैशाली यांच्या पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून विदर्भातील कलाकारांना पक्षाशी जोडण्याचा राष्ट्रवादीचा मानस असल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.