हे पवारांच सरकार आहे तुमच्या बापाच्यान पडणार नाय आनंद शिंदेंचा गाण्यातून फडणवीसांना टोला

0

देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीत सभा घेत समाधान अवताडेंचा प्रचार केला.सभेदरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले,”सरकार कधी पाडायच ते तुम्ही माझ्यावर सोडा”.सध्या फडणवीसांच्या या वक्तव्यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.दरम्यान पंढरपुरात अजित पवार,जयंत पाटील यांनी सभा घेतल्या असून भारत भालकेंच्या प्रचारात रान उठवल आहे.

गायक आनंद शिंदे यांनीही मंगळवेढ्यात सभा घेतली असून त्यात त्यांनी भारत भालके यांच्या आठवणी जाग्या केल्या,आनंद शिंदे म्हणाले भारत भालके माझे जुनी स्नेही असून ते मला नेहमी “काय ओ गाववाले अस म्हणून हाक मारत असत.”आनंद शिंदे हे मंगळवेढ्यातील असून त्यांच बालपण तेथेच पार पडलेल आहे.

आनंद शिंदेंनी सभेतही गाण गात फडणवीसांना टोला हाणला त्यांनी फडणवीसांवर टिका करत त्यांनी केलेल्या घोषणेला उत्तर दिल,”हे पवारांच सरकार हाय तुमच्या बापाच्यान पडणार नाय”.आनंद शिंदेंनी रचलेल्या या गाण्याचा रोख भाजप आणि प्रामुख्यान देवेंद्र सरकार आहे हे सूज्ञ जनतेच्या लक्षात आल.

भारत भालके यांचा मृत्यू झाल्यानेच पंढरपुरात पोटनिवडणुका लागल्या असून भारत यांचे पुत्र भगीरथ हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.