सई ताम्हणकर सह या आठ अभिनेत्रींनी मांडलाय दुसरा संसार

0

चित्रपटसृष्टीत हरघडी नाती बदलत असतात. काही संसार दिर्घकाळ टिकतात परंतु काही नाती लगेचच संपुष्टात येतात. मराठी चित्रपट सृष्टीत लिव इन रिलेशनदेखील सुरू आहे. इतकी संपन्नता असलेल्या या कलाकारांचे संसार मात्र फार दिवस टिकत नाहीत. अर्थात काही सकारात्मक उदाहरणही आहेत. संजय मोने, सुकन्या मोने, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर. आज आपण इथे दुसरा संसार मांडणार्या आठ अभिनेत्र्या बघणार आहोत

१) अभिज्ञा भावे… तुला पाहते रे मध्ये उत्तम भूमिका करणारी अभिज्ञा एक एअर होस्टेस होती. तिचा पहिला नवरा तरूण वैतीकर होता तर दुसरा नवरा तिने मेहुल पै याला करून घेतल आहे.
२) पल्लवी पाटील…. बापमाणूस मालिकेत काम करणार्या पल्लवी पाटीलने पुढच पाऊल यामधील संग्राम समेळशी लग्न केल आणि दोन वर्षातच घटस्फोट घेतला.
३) रेशम टिपणीस….. रेशम टिपणीस मध्यंतरी बिग बाॅस मध्ये दिसून आली होती. रेशम टिपणीसने खूप दिवस संजीव सेठशी डेटींग करून त्याच्याशी लग्न केल. सध्या तिची मुल लग्नाला आलेली आहेत अशावेळी इतक्या वर्षांचा संसार घटस्फोट घेत तिनी संपुष्टात आणला आहे.
४) तेजश्री प्रधान…. होणार सून मी या घरची सेटवर शशांक केतकर आणि तेजस्वी प्रधानची ओळख झाली आणि नंतर ओळखीच रुपांतर प्रेमात झाल. दोघांचा विवाहही थाटामाटात पार पडला परंतु अल्पावधितच दोघांचा घटस्फोट झाला. शशांक केतकरने दुसर लग्न केलेल आहे.
५) स्मिता गोंदकर….. पप्पी दे पारूला हे गाण गाजवणारी स्मिता गोंदकर बिग बॉसमध्ये शेवटपर्यंत टिकली. स्मिता गोंदकरने मुंबईचा नगरसेवक सिध्दार्थ भाटिया याच्याशी लग्न केल, परंतु काही दिवसातच तिने त्याला घटस्फोट दिला.
६) उषा नाडकर्णी….. चरित्र भूमिका तसेच खलनायिका उत्तम वठवणार्या उषा नाडकर्णी यांचा विवाह आनंद नाडकर्णी यांच्याशी झाला होता, त्यांनीही त्यांचा दिर्घ संसार घटस्फोट घेत संपुष्टात आणला होता.
७) सई ताम्हणकर….. सर्वाधिक मानधन घेणारी सई ताम्हणकर हिने अमेय गोस्वामी याच्याशी विवाह केला होता. तो लगेचच संपुष्टात आला व तिने त्याला घटस्फोट दिला. सई ताम्हणकर सध्या सिंगल आहे.
८) रुपाली भोसले….. आई कुठे काय करते या गाजणार्या मालिकेत संजनाची भूमिका निभावणारी रुपाली भोसले वैयक्तिक आयुष्यातही दोन लग्नाला सामोरी गेली आहे. मिलींद शिंदे तिचा पहिला नवरा होता.
वरील उदाहरणावरून इतकच लक्षात येत की, निव्वळ संपन्नता संसार टिकवू शकत नाही तर त्यासाठी मन जुळावी लागतात.

Leave A Reply

Your email address will not be published.