अक्कडबाज मिशांवाल्या आजोबांचे चिमुरडीला पत्र.

0

कॉलर नको स्कॉलर हवा” अशी प्रसिद्ध घोषणा विधानसभा निवडणुकीच्या काळात साताऱ्याच्या पोट निवडणुकीत राज्यात गाजली होती. साताऱ्यातील शरद पवार साहेब यांच्या सभेने तर महाराष्ट्रातील वातावरण फिरवले. महाराष्ट्रातील अजरामर सभा म्हणून आजही या सभेचे नाव सगळ्यांच्या तोंडी आहे. महाराष्ट्रात हुशार माणूस म्हणून श्रीनिवास पाटील भलतेच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आणि शरद पवार साहेब यांच्या मैत्रीचे किस्से लोकांच्या तितकेच ओठावर आहेत.

आपल्या मिशा मुळे लक्षात राहणारे त्यांचे वेगळेपण आहे. याच मिशावाल्या आजोबांनी एका चिमुरडीस पत्र लिहिताना आपल्यातील संवेदनशीलतेचे दर्शन घडविले आहे. त्या चिमुरडीचे नाव आहे रमा अवधूत भट. रमा जेमतेम पाच वर्षाची आहे. तिचे गाव आहे क-हाडलगतच्या सैदापूर. तिचे अध्यात्मिक पठण मोठे आहे. सोबतच चित्रकलेची आवड पण ती जपते आहे. रमाचे आजोबा बंडा भट आणि श्रीनिवास पाटील हे वर्गमित्र त्यामुळे खा. श्रीनिवास पाटील यांच्या मैत्री खातर कायम भेटी गाठी होत असतात. तिच्या या कला गुणांचे श्रीनिवास पाटील यांनी कौतुक सुद्धा केले.


इतकेच नव्हे तर तिला तिच्या मिशा वाल्या आजोबांनी एक स्पेशल पत्र सुद्धा लिहिले आहे. पत्रात त्यांनी एकमेकांची चांगलीच कौतुक करत सिक्रेट सांगितली आहेत. तिला मोठी हो असा आशीर्वाद देत काही गोष्टींच्या बाबतीत संवाद साधताना खा. श्रीनिवास पाटील लहान मूल होऊन गेले आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.