
भाजपचे ओळखपत्र दाखवा, पेट्रोल मोफत मिळवा; शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखी ऑफर!
भाजप आणि शिवसेने मध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली उडत आहे. राडे करुन झाल्यानंतर आता शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता दिसून येत आहे. कारण वर्धापन दिनानिमित्त आज शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करत. भारतीय जनता पार्टीला मुद्दाम डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
वर्धापन दिनानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी स्वस्त पेट्रोल वाटपाची घोषणा केली आहे. मात्र त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. त्यानुसार सर्वसामान्य नागरिकांना 100 रुपयांत 2 लिटर पेट्रोल (प्रति वाहन) देण्यात येणार तर भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी 1 लीटर पेट्रोलचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे केंद्रात सरकार आहे; केंद्र सरकारचे महागाई वरील नियंत्रण सुटले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून केंद्र सरकारला टोला लावत, अनोख्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्याची चर्चा सोशल मीडिया वर होताना दिसत आहे.