निराधार महिलेचा आधार ठरल्या शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे…

0

अनेकदा लोकांची ओरड असते पुढारी आपले काम करत नाहीत. मात्र बहुतांश नेते मंडळी या गोष्टीला अपवाद आहेत. सतत वाजणारा मदतीसाठी चा फोन, कमगाजात व्यस्त असणारे शेड्युल अशा मध्ये पारगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील निराधार वृद्धेला याबाबत वेगळाच अनुभव आला. या वृध्द महिलेने मदतीसाठी थेट फोन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना केला.

तत्काळ नीलमताई यांनी फोन उचलला आणि कसलीही पार्श्वभूमी नसलेल्या वृध्द महिलेला मदत सुद्धा केली. निराधार व्यक्तींच्या बाबतीत नीलम गोऱ्हे यांचे मोठे काम आहे हे या वृध्द निराधार महिलेला माहित होते. L त्याच आशेने तीने फोन केला अन् त्या निराधार वृद्धेचा विश्वास खरा ठरला.

या महिलेचे नाव आहे शोभाताई अनंता (वय ६६) त्या पारगाव येथील रहिवासी आहेत. मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या या महिलेची लॉकडाऊनमध्ये जवळचे पैसे संपून गेल्याने आर्थिक परिस्थिती हालाखिची झाली. हाताला काम नसल्याने, आणि कोणाचाही आधार नसल्याने त्या निराधार झाल्या होत्या. त्यांना शेवटचा आधार म्हणून वाटणारी एकच व्यक्ती वाटत होती ती म्हणजे नीलम गोऱ्हे…त्यांनी घाबरत घाबरत थरथरत्या हातांनी फोन केला. आणि त्याच विश्वासाने त्यांना मदत मिळाली.

त्यांनी तत्काळ फोन ची दखल घेत शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी तालुकाप्रमुख अनिल सोनवणे यांना दूरध्वनीवरून महिलेची माहिती देत मदत करण्यास सांगितले. गोऱ्हे यांच्या सूचनेनंतर सोनवणे यांनी पारगाव येथे जाऊन निराधार महिलेला पुढील तीन महिन्यांचा किराणा व धान्य दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.