शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी भाजपचे आमदार कुटे यांचा घेतला खरपूस समाचार

0

शिवसेना,भाजपची युती तुटल्यापासून दोघेही एकमेकांवर टिका करत असून सतत शाब्दिक चकमक सुरू असते.देवेंद्र फडणवीस कोरोना परिस्थितीवरून सातत्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टिका करत असतात.कोलमडून पडलेल नियोजन,राजीनामे देते मंत्री अशा प्रकारची टिका सर्वच भाजपचे नेते करत असतात.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना शेलक्या शिव्या देत त्यांच्यावर जोरदार टिका केली होती.या टिकेवरून बरीच उलटसुलट चर्चा सुरू होती.संजय गायकवाडांच्या भाषेचा बरेचजणांनी निषेध केला होता.मात्र संतप्त शिवसेना आमदार संजय गायकवाड परत त्याच भाषेत बोलत भाजपचे आमदार कुटे यांचा खरपूस समाचार घेताना दिसून येत आहेत.

भाजपचे आमदार कुटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टिकेला प्रत्युत्तर देताना कडक भाषा वापरली होती,यावर परत संजय गायकवाड यांनी संतप्त होत दिवसभर दारू पिऊन वावरात पडणारा कुटे अशी त्यांची संभावना केली आहे.एवढ्यावरच ते थांबले नाहीत ते म्हणाले,”कुटे लांबून बोलू नकोस माझ्या ५० मीटर जवळ उभारून दाखव मग बघू”.अशा प्रकारे आव्हान देत संजय गायकवाडांनी दंड थोपटले असून भाजपचे आमदार कुटे काय उत्तर देतात हे पाहाव लागेल.

या दोघांच्या शाब्दीक चकमकीत पक्षीय राजकारणावरून बाब वैयक्तिक राजकारणावर आली आहे.देवेंद्र फडणवीसांनीही संजय गायकवाडांना उध्दव ठाकरे यांची कोंबडा अशी संभावना करत प्रत्युत्तर दिल आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.