
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय संग्रहालयाचे १५ ऑगस्टला भूमिपूजन!
महाराष्ट्रातील जनतेच्या साठी आनंदाची बातमी आहे ही “छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय संग्रहालय रत्नागिरी शहरात उभारले जाणार आहे” . या संग्रहालयाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त हा १५ ऑगस्ट ठरला असून या दिवशी भूमी पूजन होणार आहे. या वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराजांवरील दुर्मीळ पुस्तकेही वाचनालयात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा हा ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून प्रत्येक कॉलेज व विद्यापीठात साजरा करण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
संवाद साधला असताना त्यांनी सांगितले की संभाजीराजे छत्रपती यांच्याशी या विषयाशी संबंधित चर्चा करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अभ्यास करता यावा, या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय रत्नागिरीत शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या (बीएड्) जागेत उभे करण्यात येणार आहे.
तसे सामंत म्हणाले म्हणाले की या संग्रहालयासाठी छत्रपती शिवरायांवर अभ्यास करणार्या पाच लेखकांची समिती पुस्तके व अन्य साहित्यासाठी नेमण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.