शिवसेनेचा नारायण राणेंना शह, चिपी विमानतळाचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते

0

चिपी विमानतळाच्या श्रेयवादावरून चांगलाच वाद पेटला होता. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाला विरोध केला होता. परंतु आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत ९ ऑक्टोबरला विमानतळाचे उदघाटन होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल मंत्रालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली

विमानपत्तन प्राधिकरण नागर विमानन महानिदेशालय यांच्यातर्फे लागणारे सर्व परवाने प्राप्त झाले आहेत. विमानतळासाठी विकास करार झाले आहेत. या विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विमानतळामुळे कोकणाच्या विकासाला चालना मिळेल, पर्यटन व्यवसाय विस्तारण्यास मदत होईल. कोकणाचे आकर्षण असलेल्या समुद्रापर्यंत आता विमान वाहतूक सुरु झाल्याने अधिकाधिक पर्यटकांना पोहोचता येणार आहे, असेही देसाई यांनी यावेळी सांगितले.

विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा, रस्ते विकास, संरक्षण भींत या सारखी कामे एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात आली आहेत यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून १४ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. एकूणच कोकणच्या पर्यटनाला प्रोत्साहन देणारा या प्रकल्पाच श्रेय लाटण्याचा प्रयत्न भाजप आणि नारायण राणे यांनी सुरू केला असून उदघाटनाला मुख्यमंत्र्यांचीही गरज नसल्याची वल्गना नारायण राणे यांनी केली होती. यावर उद्योगमंत्री सुभाष देसाई व इतर शिवसेना नेत्यांनी परखड उत्तर देत नारायण राणेंना आव्हान दिलेल आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.