शिवसेनेची विचारसरणी सहन करू शकतो पण…; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले राजकारण!

0

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर घडत असलेल्या घडामोडी मुळे राज्यातील राजकीय पटलावर चांगलीच चर्चा रंगली आहे. गावा, खेड्यात भाजप सेना ऐकत्र येणार का ? असे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. मात्र काँग्रेससह राष्ट्रवादीचे नेतेही हे सरकार ५ वर्षे टीकेल असे ठणकावून सांगत आहेत. काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा जरी सुर असला तरी सरकार ५ वर्ष टिकले पाहिजे म्हणून काँग्रेस नेते आग्रही असल्याचे दिसून येत आहे.

या बाबतीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही असे त्यांनी सांगितले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांना पत्रकारांनी विचारले होते की “महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात आलं आहे का?” त्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की “अजिबात नाही. भाजपाला बाहेर ठेवण्याच्या दृष्टीकोनातूनच हे सरकार स्थापन करण्यात आलं होतं. भाजपने राज्यात सर्व गोंधळ घातला होता. आमचं उद्दिष्ट अद्यापही तेच आहे. काँग्रेस काही जिल्ह्यांमध्ये इतकी मजबूत नसून आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे,” असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

तसेच, शिवसेना-काँग्रेसच्या असलेल्या वैचारिक भिन्नते बद्दल पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, तुम्ही त्याकडे हवं तसं पाहू शकता. पण, हे सरकार एका विशिष्ट ध्येयाने तयार करण्यात आलं आहे. आम्ही शिवसेनेची विचारसरणी सहन करु शकतो, पण भाजपाला अजिबात नाही”, अशा स्पष्ट उत्तराने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.