शिवसेनेचा जन्म कोणाची पालखी वाहण्यासाठी नाही, स्वाभिमानाने पुढे जाऊ : उध्दव ठाकरे

0

आज शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधत होते. त्या वेळी बोलत असताना त्यांनी स्वबळाचा नारा दिला, मात्र नारा देत असताना त्यांनी विस्तृतपणे स्वबळ म्हणजे नेमके काय हे सांगितले. ते म्हणाले “स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढणं नाही. न्यायहक्कासाठी स्वबळ पाहिजे. पराभूत मानसिकता घात करते. स्वबळाचा नारा हा आमचा हक्क आहे. अन्याय विरुद्ध लढा हे आमचं स्वबळ आहे”.

इतक्यावरच न थांबता त्यांनी पश्चिम बंगाल मधील निवडणुका बद्दल पण बोलले ते म्हणाले की बंगालने स्वबळाचा खरा अर्थ दाखवून दिला. ममतांनी बंगालची ताकद दाखवून दिली. असे म्हणत त्यांनी भाजपला चांगलाच टोला लावला आहे.

तसेच उध्दव ठाकरे म्हणाले की शिवसेना सत्तेसाठी कधीही लाचार होणार नाही. उगाचच कोणाची तरी पालखी ही वाहणार नाही. शिवसेनेचा जन्म पालखी वाहण्यासाठी नाही. आम्ही स्वाभिमानाने चालू. हे शिवसैनिकाचं ब्रिद आणि हीच आपली तादक आहे! असे ते म्हणाले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.