स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेची 10 लाखाची मदत, स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठीही मदत करणार- एकनाथ शिंदे

0

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनसुद्धा नोकरी मिळत नसल्यामुळे स्वप्नील लोणकर या तरुणाने काही दिवसांपूर्वी एक चिठ्ठी लिहीत आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. आज शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचा धीर देण्याचा प्रयत्न केला. स्वप्नीलच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून १० लाख रुपये मदत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी स्वप्नील लोणकरच्या घरी सांत्वनपर भेट दिली होती. यावेळी सुप्रियाताई सुळे यांनी स्वप्निलच्या बहिणीस एक मोबाईल दिला व तिच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जे काही सहकार्य लागेल ते करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. स्वप्नील लोणकर च्या कुटुंबासोबत सत्ताधारी पक्षातील सर्वच नेते खंबीर पणाने उभा राहिले आहेत.स्वप्नीलने असा काही निर्णय घ्यायला नको होता, अशी हळहळ सगळेच व्यक्त करत आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.