शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या घरात घुसून धक्काबुक्की व शिवीगाळ…वाचा नेमके काय झालं!

0

शिर्डी मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उंबरगाव येथील निवासस्थानी अनाधिकृतपणे घरामध्ये घुसून खासदारांच्या अंगरक्षक व वॉचमन यांना धक्काबुक्की केली. चार अनोळखी व्यक्तींनी प्रवेश केला होता. त्यांच्या या कृतीच्या मागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.

अंगरक्षक व वॉचमन यांच्यावर शिवीगाळ व धक्का बुक्की केल्याच्या आरोपावरून उदय लिप्टेसह चार अनोळखी व्यक्तीवर सरकारी कामकाजात अडथळा आणला. असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खासदार सदाशिव लोखंडे यांचे अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल विनोद वसंतराव उंडे यांनी बेलापूर आऊट पोस्ट या ठिकाणी फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीत असे म्हटले आहे की खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उंबरगाव येथील सायक खेमानंद फाउंडेशन ट्रस्ट येथे उदय शिवाजी लिप्टे व इतर चार इसम दोन मोटार सायकलवर आले. त्यांनी लाथा मारुन बंगल्याचे गेट उघडले. या बाबत तेथील वॉचमन निलेश शिंदे यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यास शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.

अनधिकृतपणे प्रवेश करुन आतमध्ये असलेल्या गाड्याचे पान कापड फाडून गाड्याचे व्हीडीओ शुटींग केले नंतर खासदार लोखंडे याच्या निवासस्थानाकडे प्रवेश करत असताना खासदार लोखंडे यांचे अंगरक्षक पोलीस काँन्स्टेबल उंडे यांनी त्यांना मज्जाव केला असता. पढेगाव येथील उदय शिवाजी लिप्टे व चार अनोळखी व्यक्ती विरुध्द भा .द .वि .कलम १४३,१४७,४५२,३५३,३३२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन.पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.