डोळ्यात मिरचीपूड टाकून धारदार शस्त्राने वार, अमरावतीत शिवसेना शहरप्रमुखाची निर्घृण हत्या

0

अमरावतीमध्ये शिवसेनेच्या तिवसा शहर प्रमुखाच्या हत्येमुळे महाराष्ट्र राज्यात मध्ये खळबळ निर्माण झाली आहे. ज्या युवकाची हत्या करण्यात आली त्याचे नाव अमोल पाटील असल्याची माहिती समोर येत आहे. वय वर्षे ३४ असणाऱ्या अमोल पाटील यांची हत्या डोळ्यात मिरची पावडर टाकून करण्यात आली. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा शहरातील आशीर्वाद वाईन बारसमोर शनिवारी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

या हत्येमागे नेमके कारण अजून समोर आलेले नाही मात्र अमोल पाटील आपल्या मित्रांसमवेत शनिवारी रात्री आशीर्वाद बारमध्ये गेला होता. बार बंद झाल्याने दोघंही बारसमोर बसले होते. यावेळी दोन ते तीन जणांनी अमोल पाटीलच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. त्यानंतर त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले.

या घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. वर्दळीच्या ठिकाणी राजकीय पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याने जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.