
शिवसेना नाराज ही तर अफवा; शरद पवारांचा या सरकारला पूर्ण आशीर्वाद – संजय राऊत
महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत वाद असल्याचा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या बातम्या अफवा आहेत तसेच माध्यमांमध्ये शिवसेना नाराज असल्याच्या ज्या काही बातम्या येत होत्या त्या निव्वळ अफवा आहेत यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. शरद पवार हे बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्यामुळे घरी होते. त्यामुळे ते बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले शरद पवारांचा या सरकारला पूर्णपणे आशीर्वाद आहे; हे सरकार पाच वर्षे चालेल. तसेच संजय राऊत म्हणाले प्रत्येकच वेळी राजकारणावर चर्चा झाली पाहिजे का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे आणि पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला.