शिवसैनिकांनी शिव “प्रसाद” दिला आता शिवभोजन थळी देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतयांनी भाजपला सुनावले !

0

शिवसेना भवनाच्या समोर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या मध्ये चांगलीच धुमश्चक्री झाली होती. राज्यभरात हा विषय चांगलाच वेगाने पसरला आणि सेना भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये चांगलेच वातावरण तंग निर्माण झाले होते. ‘ज्यांनी कुणी शिवसेना भवनावर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना शिवसैनिकांनी प्रसाद दिला आहे. आता हे प्रसादापुरताच मर्यादित राहु द्या. त्यांना शिवभोजन थाळी आणून देण्याची वेळ आणू नका’ अशा कठोर शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला सुनावले आहे. ते इतक्यावरच बोलून थांबले नाहीत तर ते म्हणाले की, ‘हा विषय संपलेला आहे, आमच्याकडूनही विषय संपला आहे’ असंही राऊत म्हणाले.

तसेच संजय राऊत की ‘शिवसेना भवनावर हल्ला वगैरे काही झाला नाही. शिवसेना भवनावर हल्ला करण्यात कुणाची हिंमत नाही. तसेच संजय राऊत म्हणाले की शिवसेना भवन हे महाराष्ट्र राज्याच्या अस्मितेचे प्रतीक आहे असे म्हणत त्यांनी चांगलेच फटकारले आहे.

तसेच संजय राऊत म्हणाले की ‘सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय लिहिलं आहे, आधी ते नीट तर वाचा. जे जमीन घोटाळ्याचे आरोप झाले आहे, त्याची चौकशी व्हावी आणि जर खोटे असेल तर आरोप करणाऱ्यांवर कारवाई करावी, असं स्पष्ट आम्ही म्हणालो आहोत असेही ते म्हणाले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.