मराठी चित्रपट सृष्टीतील ही प्रसिध्द अभिनेत्री आहे अंथरुणाला खिळून

0

ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर उत्कृष्ट ग्रामीण बाज असणार्या नायिका निभावत असत. मधु कांबीकर यांनी नायिका म्हणून एकेकाळी मराठी चित्रपट सृष्टी गाजवली. त्यांनी निभावलेल्या आईच्या भूमिकाही प्रेक्षकांना भावल्या. सोज्वळ, ग्रामीण आई लोकांना अतिशय आवडली. बीन कामाचा नवरा, शापित इ लक्षवेधी चित्रपटात त्यांनी नायिका म्हणून काम केले तर झपाटलेला, माझा छकुला या चित्रपटातून आई, भावजय अशा चरित्र भूमिका निभावल्या. मधु कांबीकर सध्या अंथरुणाला खिळून असून चला जाणून घेऊया त्यांचा जीवनपट.

मधु कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी अहमदनगर येथील कांबी या गावी एका कोल्हाटी कुटुंबात झाला. त्यांच्या घरातच अभिनयाचे वातावरण होते. त्यांचे वडील नाटकात भूमिका करत असत. लहानपणापासूनच मधु कांबीकर दौरे करू लागल्या आणि अभिनय त्यांच्यात रूजू लागला. पुण्यातील बाळासाहेब भोसले यांच्याकडून त्यांनी कथ्थकचे प्रशिक्षण घेतले. कलाक्षेत्राची अपार ओढ आणि आदर या भावनेतून त्यांनी लावणी संदर्भातील लिखित साहित्य एकत्र करून तमाशाचा सुरुवातीपासूनचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या फडातील ११ जणांनी यासाठी मदत केली. अस्सल लावणी प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी “सखी माझी लावणी” हा कार्यक्रम सादर केला व त्याला उत्तम प्रतिसाद लाभला.

नृत्य कार्यक्रमाबरोबरच त्यांनी एक होता विदूषक, येऊ का घरात, मला घेऊन चला इ चित्रपटाही केले. मधु कांबीकर यांना २००४ साली पक्षाघाताचा (लकवा) सौम्य अॅटॅक आला होता. त्यात त्यांना तातडीने रुग्णालयात अतिदक्षता विभागात अॅडमिट करण्यात आले होते. परिणामी काही वर्षे त्या रंगमंचापासून दूर राहिल्या. परंतु त्यांचे कलाकार मन स्वस्थ नव्हते. त्यांनी पुन्हा नृत्य शो सुरू केले होते. पुण्यात त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळाले व कला फूलून रूजली त्यामुळे पुण्यावर त्यांचा विशेष लोभ होता. पुण्याची रंगभूमी आणि गोपिनाथ सावरकर प्रतिष्ठान यांनी २७ नोव्हंबर २०१६ रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात आयोजित लावण्य संगीत कार्यक्रमात नृत्य सादर करताना मधु कांबीकर यांना अस्वस्थ वाटू लागले. तरीही त्यांनी शो मस्ट गो आॅन या ब्रिदानुसार भैरवीचे सादरीकरण केले. त्यानंतर मेकअप रुममध्ये गेल्यावर त्यांना पक्षाघाताचा झटका आला व त्यांचा उजवा हात बधिर झाला. तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले गेले परंतु पक्षाघाताने त्यांच्या शरीर संवेदना बधिर झाल्या.

 

 

ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांची कलाक्षेत्रातील योगदानाची दखल घेत झी मराठीने २०१८ सालच्या पुरस्कार सोहळ्यात त्यांना जीवनगौरव पुरस्कार दिला. हा पुरस्कार त्यांची सून शीतल जाधव हिने स्विकारला. आपला मनोदय व्यक्त करताना त्यांच्या सुनेने सांगितले, “अशी सासु मला लाभली हे मी माझे भाग्य मानते. परंतु सध्या मधु कांबीकर मुलगा प्रीतम आणि माझ्या बोलण्याला कसलाही प्रतिसाद देत नाहीत.त्यांच शरीर बधिर झाल असून त्या अंथरुणाला खिळून आहेत. अशा स्थितीतही त्यांनी भूमिका केलेले चित्रपट पाहताना त्यांच्या डोळ्यातून अश्रु वाहतात किंवा त्या हसतात.” त्यांच कला मन अजूनही त्या आठवणीने व्यापलेल दिसून येत. कला निभावतानाच आलेल्या पक्षाघाताच्या (लकवा) झटक्याने त्यांची झालेली अवस्था मन हेलावून टाकते.

Leave A Reply

Your email address will not be published.