पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात “नमामि गंगे ऐवजी शवामी गंगे”

0

भारतातील रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. सद्य परिस्थिती मध्ये जगातील क्रमांक तीनला रुग्ण संख्येच्या बाबतीत आपला देश आहे. केंद्र सरकार ठोस अशी कामगिरी करताना दिसत नाही. प्रत्येक दिवशी रुग्णांची संख्या नवनवीन विक्रम स्थापन करत आहे. मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. परिस्थिती हातामध्ये यायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये देशाचे पंतप्रधान समोर यायला तयार नाहीत.

आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला आहे. उत्तर प्रदेश मधील परिस्थिती हाताच्या बाहेर गेली आहे. लोकांच्या टेस्ट होत नाहीत, ऑक्सिजन मिळत नाही, उपचार होत नसल्याने रुग्ण मृत्यू पडण्याचे प्रमाण मोठे आहे.

उत्तरप्रदेश, बिहार राज्यातून वाहणाऱ्या गंगा नदी मध्ये मोठ्या संख्येने मृतदेह सापडले आहेत. रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याच्या ऐवजी गंगेत सोडून देण्यात आले आहेत. काँग्रेस नेत्यांनी या गोष्टीवरून भाजप सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. महाराष्ट्रातील लोकसभेचे खासदार बाळू धानोरकर यांनी नरेंद्र मोदींना लक्ष केले आहे. ते म्हणाले की ननामी गंगे शवामी गंगे हा प्रकार सुरू झाला असून भारताचा जगभरात अपमान झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.