केरळच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी पुन्हा!; मिळालं मंत्रिपद

0

सलग दुसऱ्यांदा डाव्यांनी केरळ विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत मिळवत सत्ता स्थापन केली आहे. १८ दिवसांच्‍या नंतर सरकार स्थापन करण्यात आले असून. पी. विजयन यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता केरळमध्ये छोटेखानी कार्यक्रमात हा शपथविधी समारंभ संपन्न झाला. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी या वेळी मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.


केरळ मध्ये राष्ट्रवादीने चांगलीच बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केरळ मधील मंत्रिमंडळात एक मंत्रिपद मिळाले आहे. २० आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विशेष म्हणजे या मंत्री मंडळात दोन चेहरे सोडले तर सगळेच नवीन चेहरे आहेत. डाव्या पक्षातील एकाही जुन्या मंत्र्याचा समावेश या मध्ये नाहीये.

राष्ट्रवादीचे नेते ए. के. शशीधरन यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शशीधरन आणि विजयन यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.