पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या तरुणाच्या छातीवर शरद पवारांचा टॅटू!

0

भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा आरोपी अमित सुरवसे हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मोठा फॅन आहे त्याने दगडफेक केल्यानंतर शरद पवारांच्या नावाच्या घोषणा देत तिथून धाव घेतली होती याप्रकरणी अमित सुरोशे या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

एक जुलै रोजी भाजप आमदार गोपीचंद पडळकर घोंगडी बैठकांसाठी सोलापूर मध्ये आले होते श्रीशैल नगर येथे त्यांच्या गाडीवर ती दगडफेक करण्यात आली होती ही दगडफेक करून अमित सुरवसे आणि त्याचा सहकारी निलेश शिरसागर हे फरार होते अखेर तीन जुलैला त्यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा येथून ताब्यात घेण्यात आले होते

पोलीस तपासात अमित सुरवसे यांनी शरद पवारांवर आपले असणारे विशेष प्रेम स्वतः सांगितले होते. यावेळी छातीवर शरद पवार यांचा फोटो पोलिसांना गोंदलेला आढळला. त्याखाली “द वॉरिअर’ असे लिहिले आहे. हा फोटो हल्ल्याच्या आधीपासून गोंदवलेला असल्याचं समोर आलं आहे. अमित सुरवसे हा धनगर समाजातील युवक असून नातेवाईकांच्या शैक्षणिक संस्थेत असिस्टंट म्हणून काम पाहतो. त्याने यापूर्वी दोन वेळा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही दिल्या आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.