
सोमवारी शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना तातडीने ब्रिच कँडी रुग्णालयात नेण्यात आले.प्राथमिक तपासणीनंतर पित्तशयाचा त्रास असून त्यात खडे झाल्याच निष्पन्न झाल.परिणामी शरद पवारांची शस्त्रक्रिया 31 मार्चला करण्याच ठरवल होत.परंतु मंगळवारी अचानक शरद पवारांचा पोटदुखीचा त्रास बळावला परिणामी त्यांना तातडीने ब्रिच कँडी रुग्णालयात अॅडमीट करण्यात आल.
दरम्यान शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर अमित मायदेव यांनी सांगितले की, काही चाचण्या केल्यानंतर शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत काही समस्या आम्हाला दिसून आल्या होत्या.त्यानंतर त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे,अशी माहिती डॉक्टर मायदेव यांनी दिली.शस्त्रक्रियेनंतर पवारांना दहा दिवस रुग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की,शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.पवार साहेबांच्या पित्ताशयातील खडे शस्त्रक्रियेनंतर बाहेर काढण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.