
आजारी असतानाही लिहिलेली शरद पवारांची चिठ्ठी होते आहे व्हायरल!
आमदार खासदाराचे एक महिन्याचे वेतन कोरोना संदर्भात मृत्यू मुखी पडलेल्या राज्यातील आरोग्य सेवा, पोलीस दल, शासकीय कर्मचारी, यांच्या साठी आपल्या पक्षाच्या मार्फत तसेच १ कोटी रुपये राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट तर्फे देण्यात यावेत. श्री. टकले व्यवस्था करतील.
अशा आशयाचे पत्र शरद पवार साहेब यांनी स्वतः आजारी असताना सुद्धा महाराष्ट्राच्या साठी दिले हे त्यांचे मोठेपण आहे. उगाच महाराष्ट्रातील जनता त्यांना सह्याद्रीची उपमा देत नाही. अडचणीच्या काळात कसे खंबीरपणे उभा रहावे हे वेळोवेळी शरद पवार साहेब यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या मोठेपणाची दखल उभा महाराष्ट्र वेळोवेळी घेत आहे. किल्लारी पासून ते मुंबई पर्यंत, तसेच पुर परिस्थिती पासून ते मुंबई बॉम्ब स्फोट पर्यंत जनतेला सुखरून बाहेर काढण्याचे काम शरद पवार साहेब यांनी केले आहे!