
अनिल देशमुख प्रकरणात शरद पवारांची खंत
शरद पवार यांच नुकतच पोटाच आॅपरेशन झाल असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.परंतु एक पक्षाध्यक्ष,ज्येष्ठ नेते यांमुळ त्यांना सातत्यान सक्रिय राहाव लागत.सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार असून राष्ट्रवादी सत्तेचा एक भाग आहे.उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादीचे अजित पवार भूषवत आहेत.तसेच विविध खात्याचा कारभार राष्ट्रवादीचे नेते सांभाळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोना स्थिती,मंत्र्यांचे राजीनामे, येऊ घातलेल्या निवडणुका,पक्ष भूमिका, धोरण यांवर चर्चा करण्यासाठी सिल्वर ओक येथे बैठक पार पडली.या बैठकीस जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील,जितेंद्र आव्हाड,अनिल देशमुख व इतर नेते उपस्थित होते.
यावेळी अनिल देशमुखांबाबत भूमिका मांडताना शरद पवार म्हणाले,या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नाहीत,तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी माध्यमांमध्ये भूमिका मांडण्यात पक्ष कमी पडला आहे याची मला खंत आहे.सुप्रिम कोर्टानेही अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करावी असे नमूद केले आहे, या चौकशीला अनिल देशमुख सामोरे जाताना पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे.अस पवारांनी स्पष्ट केल.
शरद पवारांनी बैठकीत मार्गदर्शन करताना नेत्यांनी एकमेकांना सहकार्य करत वाटचाल करावी असे सांगितले,राज्यात सुशासन ठेवावे तसेच येणाऱ्या निवडणुकात यश मिळवण्यासाठी कोरोना नियम पाळत कामाला लागावे अस स्पष्ट केल.