
शरद पवार इज बॅक, कोरोना संकटात शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांना मदत देण्याचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सल्ला!
शरद पवार यांची प्रकृती खालावली होती. आत्ताच काही दिवसांपूर्वी दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. प्रकृती स्थिरावल्या नंतर शरद पवार पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी सध्याच्या परिस्थिती बद्दल मार्गदर्शन पर सूचना करत राज्य सरकार ला सल्ला दिला आहे. तसेच राज्य सरकार ने केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात देखील उद्योग व्यवसायाला संजीवनी देणारी, रोजगाराला प्रोहस्तहान देणारी योजना राबवावी अशी सूचना शरद पवार यांनी राज्य सरकारला केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मदत द्या, असा सल्ला पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे. ते म्हणाले की कोरोना संकटात शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांना मदत देण्याची ही वेळ आहे. अडचणीच्या वेळी नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे. लोकांच्या प्रश्नांच्या बद्दल असणारी त्यांची समज ही खूप मोठी आहे. कोणत्याही संकटात ते जनतेच्या साठी धैर्याने उभा राहत असतात.