
शरद पवारांवर आज पित्ताशयाची दुसरी शस्त्रक्रिया ब्रिचकँडी रुग्णालयात होणार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी पोटात दुखत असल्यान ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल केल गेल होत तिथ प्राथमिक तपासणीनंतर त्यांच्या पोटाच स्कनिंग करण्यात आल त्यात त्यांच्या पित्ताशयात खडे असल्याच आढळल व शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला गेला.
शरद पवार कॅन्सरसारख्या आजाराशी झुंजत असतानाच पोटाच्या या शस्त्रक्रियेमुळे सर्व काळजीत होते,परंतु पोटाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली व शरद पवारांना 7 दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला.दरम्यान त्यांच्यावर अजून एक शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचही डॉक्टरांनी स्पष्ट केल.
शरद पवार पहिल्या शस्त्रक्रियेनंतर घरातूनच सक्रिय होते.पक्षाध्यक्ष असल्यान त्यांच्या मार्गदर्शनाची गरज पक्षाला तर असतेच पण अनुभवी व जेष्ठ नेते म्हणून राज्यातही त्यांच्या मताचा विचार केला जातो.
नुकतीच त्यांनी सिल्वर ओक येथे राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेत येणार्या निवडणुका,कोरोना,अनिल देशमुख तसेच इतर घटकांवर चर्चा करण्याबरोबरच पक्षाची धोरण, वाटचाल याबाबत मार्गदर्शन केल.
सातत्यान कार्यरत असणारा कार्यकर्ता ते नेता ते पक्षाध्यक्ष अशी भूमिका निभावणार्या शरद पवारांवर आज पित्ताशयाची दुसरी शस्त्रकक्रिया आहे.ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊन पवार साहेबांच्या प्रकृतीस आराम मिळावा अशी प्रार्थना प्रत्येक नेता व कार्यकर्ता करत आहे.त्यांच मार्गदर्शन आणि राजकीय सक्रियता अनुभवायला सगळेच उत्सुक आहेत.