
शरद पवारांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस, नागरिकांना दिल्या जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी कोविडची दुसरी लस टोचून घेतली.लसीकरणावेळी डॉ. तात्याराव लहाने स्वता उपस्थित होते.शरद पवार यांनी स्वता ट्विट करत ही माहिती दिली. ट्विटमध्ये त्यांनी डॉक्टर्स आणि टीमचे आभार मानले. विशषकरून त्यांनी डॉ.तात्याराव लहाने व लसीकरण करणार्या श्रध्दा मोरे यांचे आभार मानले.पवार साहेबांना दोन्ही लसीचे डोस श्रध्दा मोरे यांनीच दिले होते.
पवार साहेबांनी आज जागतिक आरोग्य दिनाचे निमित्त साधत सर्व नागरिकांना आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देत आवाहन केले की, लसीकरण प्रक्रियेस सर्वांनी सहकार्य करा.तसेच विषाणूच्या या लढाईत आपण सर्वांनी जबाबदारीने वागत सहभाग नोंदवा अशी विनंती केली.
पवार साहेब नुकतेच पोटाच्या आॅपरेशननंतर डिस्चार्ज घेऊन सक्तीची विश्रांती घेत आहेत.त्यातूनही ते राज्याच्या घडामोडीत सक्रिय राहण्याचा प्रयत्न करत असतात.पवार साहेबांनी ट्विटमध्ये भावना व्यक्त करताना संपूर्ण जग गेले वर्षभर कोरोना विषाणूशी लढा देत असून या सर्व परिस्थितीत विविध आव्हानांना सामोरे जाताना आरोग्य सांभाळण गरजेच आहे हे नमूद केल.तसेच नागरिकांना मार्गदर्शन करताना गर्दीची ठिकाण टाळा, मास्क वापरा तसेच सुखी व आरोग्यदायी आयुष्य जगा असा सल्ला दिला.