शरद पवार – प्रशांत किशोर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले.

0

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे देशभरातील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे. प्रशांत किशोर यांना राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जाते. काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगाल येथील निवडणुकीमध्ये त्यांनी जबरदस्त कामगिरी केली आणि त्यानंतर आपण संन्यास घेत असल्याचे जाहीर केले.

आज त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत 2024 च्या निवडणुकीत भाजपला तगडे आव्हान देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशा ही चर्चा रंगल्या आहेत यावर ती अजित पवार यांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले आहे. पुण्या मध्ये बोलत असताना अजित पवार यांना विचारले असता म्हणाले की “प्रशांत किशोर यांनी मी कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे.आता त्यांचे मागील काही अनुभव असतील, वेगळी काही कामं असतील. पण त्यांनी राजकारणाचं क्षेत्र आता सोडलं आहे. त्यामुळे त्या क्षेत्राची चर्चा होण्याचं कारण नाही”.शरद पवारांना वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकजण वडीलकीच्या नात्याने भेटत असतात. त्यापैकीच ही भेट आहे,” असे सांगितले.

२०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट आहे का ? असं विचारण्यात आलं असता, त्यांनीच आता ही माझी शेवटची निवडणूक असल्याचं सांगितलं आहे म्हणत अजित पवारांना विषयाला पूर्णविराम दिला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.