शरद पवारांनी केलं मुंबईच्या डबे वाल्यांचे कौतुक; डबेवाल्यांना सायकल वाटप!

0

मुंबईचा डबेवाला यांची संघटना आणि त्यांचे कौशल्य हा जगभरामध्ये कौतुकाचा विषय आहे या गोष्टीची दखल घेत जगभरातील नामवंत पुरस्कार हे मुंबईच्या डबेवाल्यांना देण्यात आलेले आहेत आज शरद पवार यांच्या शुभ हस्ते मुंबईचा डबेवाला सायकल वाटप करण्यात आले.
शरद पवार ट्विट करत म्हणाले की “मुंबईच्या डबेवाल्यांची संघटना जिच्या व्यवस्थापन कौशल्याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली; इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी भारतात येऊन ज्यांचे कौतुक केले त्या संघटनेच्या डबेवाल्यांकरिता मोफत सायकल वाटपाचा प्रातिनिधिक कार्यक्रम संपन्न झाला.

कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्या पुढाकाराने व संघटनेचे प्रमुख उल्हास मुके यांच्या विद्यमाने माझ्या निवासस्थानी हा हृद्य कार्यक्रम झाला.महादू हावजी बच्चे यांनी १८९० साली मुंबईत काम करणाऱ्या सामान्यवर्गासाठी जेवणाचे डबे पोहचवण्याचा उपक्रम कुलाबा येथे सुरू केला. आजमितीस सुमारे दोन लक्ष नोकरदार, कामगार, मुले यांना डबा पोहचवण्याचे कार्य ही संघटना करत आहे.

वक्तशीरपणा, सातत्य, समन्वय आणि सेवाभाव ह्या गुणांचा मिलाप असणाऱ्या संघटनेकडून खूप काही शिकायला मिळते. शतकाहून अधिक काळाच्या अनुभवाची शिदोरी पाठीशी असलेल्या संघटनेची बदलत्या काळातही वृद्धी आणि समृद्धी होत राहो याकरिता डबेवाला संघटनेला माझ्या हार्दिक शुभेच्छा! अशा आशयाचे ट्विट करत शरद पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिले आहेत व विशेष कौतुक केले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.