‘मुलगी डॉक्टर, तिला प्रॅक्टिस करु द्या’, लग्नात आशिर्वाद देताना राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाला शरद पवारांची सूचना

0

महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा माध्यमातून दौरे करताना दिसत आहेत इतकंच नव्हे तर देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब पुन्हा एकदा जोरदार सक्रिय झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी पुण्यातील नवनिर्वाचित पक्ष कार्यालयाला भेट दिली. शरद पवार पुन्हा एकदा चांगलेच अॅक्टिव झाले आहेत.

आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात वेळापूर येथे शरद पवार पोहचले. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावली. ज्या लग्नानिमित्त च्या भेटी मध्ये त्यांनी नवरीची विशेष विचारपूस केली संवाद साधल्यानंतर नवरी डॉक्टर असल्याची माहिती समजली. शरद पवारांनी तत्काळ नवरदेवाला मुलीला वैद्यकीय प्रॅक्टिस करु देण्याची त्यांनी सूचनाही केली.

विवाह सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे वेळापुरात आले होते. यावेळी त्यांनी वधू-वरास शुभेच्छा दिल्या. त्यांना मुलगी डॉक्टर असल्याची माहिती ओळख करताना सांगितली. त्यावर शरद पवारांनी मुलीला प्रॅक्टिस करणार ना असा प्रश्न उपस्थित केला. तसेच उत्तम जानकर यांच्या मुलाला मुलीला प्रॅक्टिस करु देण्याची सूचना दिली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.