
शरद पवार अशा गोड कारणा साठी गेले होते गुजरातला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गुजरातमध्ये गृहमंत्री अमित शहा यांना भेटले अशी जोरदार चर्चा असून भाजप-राष्ट्रवादीच्या सलगीचे वृत्त झळकत होते.भाजपच्या नेत्यांनी याला दुजारा दिला तर राष्ट्रवादीचे नेते मात्र अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे सांगत आहेत.खुद्द अमित शहा यांनी सगळ्याच गोष्टी जाहीरपणे सांगता येत नाहीत असे सांगत सस्पेन्स वाढवला होता.
या सर्व चर्चेवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारल असत जयंत पाटीलांना यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीच्या बातमीत तथ्य नाही अस त्यांनी स्पष्ट केले केल.तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा वेगळी असून भाजपशी आमच सख्य शक्य नाही असही त्यांनी सांगितल भाजपला सत्तेची स्वप्न पडत असून महाविकास आघाडी भक्कम आहे.दरम्यान शरद पवार स2खर उद्योगातील परिषदेसाठी गुजरातला गेले होते अस जयंत पाटीलांनी स्पष्ट केल.पवार-शहा भेटीच्या बातम्या भाजप सतत उडवत असून आघाडी तोडण्यासाठीच त्यांचे हे प्रयत्न चालू आहेत, परिणामी आम्ही याला महत्व देत नाही असे जयंत पाटील म्हणाले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी छोट्या बचत गटावरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय 12 तासात मागे घेतला,यावर टिका करताना जयंत पाटील म्हणाले,पाच राज्यांच्या निवडणुका लागल्यात त्यात नुकसान नको म्हणूनच हा निर्णय मागे घेतला आहे