मा.शरद पवारांनी आस्थेने विचारपूस केलेल्या सर्वांचे मानले आभार

0

महाराष्ट्रात सध्या बरीच उलथा पालथ होत असून राजकीय वातावरण तापलेल आहे.कोरोना साथ वेगाने पसरत आहे.अशा पार्श्वभूमीवर विरोधक व सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोपांची फैरी झडत आहेत.परंतुमा.शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थेमुळे ब्रिच कँडी रुग्णालयात अॅडमीट करण्यात आल याची माहिती कळताच सर्वच राजकीय नेत्यांनी पवार साहेबांच्या आरोग्याविषयी प्रार्थना केली.पवार साहेबांचे सर्वच राजकीय पक्षांशी चांगले संबंध असून अनेक नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.देशातील एक ज्येष्ठ नेतृत्व,मार्गदर्शक या भूमिकेतून नेहमीच त्यांच्याकडे पाहील जात.

शरद पवार यांचे पोट दुखू लागल्याने त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात अॅडमीट केल गेल.प्राथमिक तपासणीनंतर त्यांची एंडोस्कोपी केली गेली त्यात त्यांना पित्तशयाचा त्रास आढळून आला.शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल.31मार्चला शस्त्रक्रिया करण्याच ठरवल गेल.पवार साहेबांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल सर्वांना कळल आणि त्यांच्यावर लवकर बरे व्हा तसेच आम्ही प्रार्थना करू अशा भावनांचा पाऊस पडला.राजकीय नेत्यांनाही आपसातले मतभेद विसरून पवार साहेबांच्या प्रकृतीला आराम पडावा यासाठी प्रार्थना केली.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, राज ठाकरे, उध्दव ठाकरे यांचा यात समावेश आहे.शरद पवारांनीदेखील त्यांची आस्थेने विचारपूस केलेल्या सर्वच नेत्यांचे ट्विट करून आभार मानले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.