लवकरच शरद पवारांवर गौरवगाथा; या बद्दल दिली सुप्रिया सुळे यांनी माहिती!

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांच्या कार्याची दखल देशभरातून घेतली जाते. त्यांनी आजतागायत केलेल्या कामांचा आलेख हा अधिकाधिक उंच उंचावणारा आहे. किल्लारीच्या भूकंपाच्या वेळेस त्यांनी केलेले व्यवस्थापन हे जगभरामध्ये कौतुकाचा विषय ठरले. आपत्ती व्यवस्थापन करण्यात शरद पवारांचे कसब आहे. आपत्ती आली की शरद पवारांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. इतकेच नव्हे तर महिलांना समाजामध्ये मानाची वागणूक मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण आहेत.

त्यांच्या या सर्व कार्याची गौरवगाथा आता सर्वांच्या भेटीला येणार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. आदरणीय शरद पवार साहेबांची जीवनगाथा प्रख्यात गायक आनंद प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात ऐकायला मिळणार आहे. एकनाथ माळी यांनी लिहिलेली गीते डॉ उत्कर्ष आनंद शिंदे यांनी संगीतबद्ध केली आहेत.

लोकांची उस्तुकता ही शिगेला पोहोचली आहे. शरद पवारांच्या वरती भन्नाट असे काही तरी ऐकायला मिळणार हे मात्र आता निश्चित आहे!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.