
शरद पवारांवर आरोप करण्याची सध्याची फॅशन, त्याच्या शिवाय बातम्याच होत नाहीत – संजय राऊत
महाराष्ट्रात नव्हे तर देशात खा. शरद पवारांच्या शब्दाला मोठा मान आहे. राजकारण बाजूला ठेवून त्यांच्या शब्दाला मान दिला जातो. त्यांची सूचना ऐकली जाते. महाविकास आघाडी सरकार मधील मतभे, कोरोनाची परिस्थिती अशा मुद्द्यांवरून विरोधक त्यांच्यावर टीका करताना दिसून येत आहेत. मात्र या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी चांगलीच हजेरी घेतली आहे.
काही दिवसांपूर्वी आ. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली होती या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले की “ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर आरोप करण्याची सध्या फॅशन झाली आहे. त्याशिवाय बातम्याच होत नाहीत. अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांना स्पष्टवक्ते म्हणून राज्यभरात ओळखले जाते. संजय राऊत बोलत असताना कोणाचीही भीड ठेवत नाहीत. त्यामुळं ते सतत माध्यमांच्या मध्ये चर्चेत असतात