राजभवनात भुताटकीच्या वावर, एकदा शांती यज्ञ करून घ्यावा लागेल.

0

महाराष्ट्राचे राज्यपाल सतत चर्चेमध्ये असतात; त्यांच्या वागण्यावर ती सतत टीका केली जाते.

त्यांनी कित्येक भूमिका या वेगळ्या घेतल्या, माध्यमांमध्ये ते सतत चर्चेत असतात तसेच राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चेमध्ये त्यांचे नाव सतत घेतले जाते.

विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे यावरती शिवसेनेने खोचक अशी टीका केली आहे. “राज्यपाल सहा महिन्यांपासून एका फाईलचे राजकारण करत आहेत. आता तर ती फाईलही भूतांनी पळवली आहे. राजभवनात अलीकडे भुताटकीचा वावर वाढला आहे? एकदा शांतीयज्ञ करुन घ्यावा लागेल,”

इतकेच काय तर राज्यपाल सचिवालयात विधान परिषद नामनियुक्त सदस्यांची यादीच उपलब्ध नसल्याची माहिती खुद्द राजभवनाच्या वतीने माहिती अधिकार अंतर्गत केलेल्या अर्जावर दिली आहे. यावरती शिवसेनेने आक्रमक होत चांगलीच टीका सामना वृत्तपत्रातील अग्रलेखातून केली आहे. राज्य सरकार एकमताने फाईल पाठवते आणि राज्यपाल सहा महिने निर्णय घेत नाहीत यास मंदगती म्हणावे की आणखी काय? ‘सामना’ चित्रपटातील ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ या गहन प्रश्नाप्र्रमाणे १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या फाईलचे काय झाले? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे,’ अशी खोचक टीका शिवसेनेनं केली आहे.

याबाबत माहिती अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात मागवली होती राज्यपालांच्या कार्यालयाने कळविले की फाईलच उपलब्ध नसल्याने माहिती कसली देणार? हा तर धक्कादायक वगैरे प्रकार नसून सरळ भुताटकीचाच प्रकार आहे. फार तर त्यास गूढ गौप्यस्फोट म्हणता येईल,’ असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.