जायकवाडीसाठी अगदी मृत्युच्या दाढेतून परत आले होते शंकरराव चव्हाण

0

महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात पाणीसाठा आहे. अनेक नद्या, झरे, ओढे, धबधबे, तलाव आणि धरणे आहेत. जी पाण्याची भूक भागवतात. हे पाणी छोट्या मोठ्या बंधाऱ्यांनी आणि धरणांनी अडवलेलं आहे. पण धरणांमध्ये देखील अशी काही धरणं आहेत, जी शेतीच्या, वीजनिर्मितीच्या दृष्टीने खूप महत्वाची आणि ऐतिहासिक आहेत.

या खास धरणांपैकीच एक आहे मराठवाड्यात पैठण येथे असलेलं ‘नाथसागर’ म्हणजेच जायकवाडी धरण. जायकवाडीचे वैशिष्ट्य म्हणजे, हे आशिया खंडातील सर्वात मोठं ‘मातीचं’ धरण आहे. हे धरण मराठवाड्याची तहान भागवतं. १०२ टीएमसी क्षमता असलेलं हे धरण, १९७६ साली गोदावरी नदीवर बांधण्यात आलं आहे.

मराठवाडा हा सगळा दुष्काळी भाग आहे. इथे पाण्याच्या बाबतीत नेहमीच औदासिन्य राहिले आहे. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी व नांदेड या जिल्ह्यांमध्ये अगदी पिण्यासाठी उन्हाळ्यात टँकरची वेळ यायची. अश्या या मराठवाड्याच्या भाळी जायकवाडी सारख्या धरणाची निर्मिती म्हणजे सुवर्णक्षणच होता. कारण या जायकवाडीमुळे, मराठवाड्यातील तब्बल २.४० लाख हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली आले आहे.

खरंतर पूर्णपणे माती आणि दगडांपासून बनवलेल्या या धरणाचं काम १९६५ मधेच सुरु झालं होतं. १९९७ मीटर लांब आणि ४१.३ मीटर उंच असलेल्या या धरणाचं काम पूर्ण व्हायला १९७६ साल उजडावं लागलं; पण जायकवाडी धरण जेव्हा १००% नी भरते, तेव्हा या धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यामुळे, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी व नांदेड जिल्ह्याच्या लाभक्षेत्रात दुष्काळी गावांच्या सिंचनाचा प्रश्न २ वर्षांसाठी कायमचा मिटतो.

अशा या धरणाच्या निर्मितीसाठी, तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी विशेष मोलाचे काम केले आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नांनी आणि जिद्दीने या धरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. या धरणाची निर्मिती झाली तर त्यातून मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याचा आणि त्या अनुषंगाने बरेच काही प्रश्न मार्गी लागू शकतात आणि मराठवाड्याचा विकास होऊ शकतो, हे शंकररावांनी ओळखलं.

त्यांनी हे धरण तातडीने बनवण्याचं मनावर घेतलं आणि त्यादृष्टीने काम देखील सुरु केलं. पण त्यांच्या पुढ्यात या धरणासाठी मोठा संघर्ष लिहिला होता. तेव्हा मराठवाड्याच्या विकासाची स्वप्नं पाहणाऱ्या शंकररावांना वाटलं देखील नसेल, की या  चांगल्या कामासाठी इतक्या आणि अशा अडचणी येतील.

त्यावेळी विरोधक हे धरण पूर्ण होऊ नये एकत्र आले. विरोधकांनी कोणत्याही परिस्थितीत धरण होऊच द्यायचं नाही असं पक्क ठरवलं होतं. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना संपवण्याचा देखील प्रयत्न केला.

एकदा शंकरराव कामानिमित्त शेवगावला जात होते. त्यांची गाडी एका डोंगराच्या पायथ्यापासून जात होती. आणि त्याचवेळी डोंगरावरून त्यांच्या गाडीवर मोठमोठे दगड पडायला सुरुवात झाली. हे दगड कुठून येत आहेत, हे कळायला काहीच मार्ग नव्हता पण शंकरावांचं नशीब बलवत्तर म्हणून ते यातून थोडक्यात बचावले. जायकवाडीच्या निर्मितीसाठी शंकरराव अगदी मरणाच्या दाढेतून परत आले होते.

हा जीवघेण्या प्रसंगाचे करते करविते कोण आहेत, हे चाणाक्ष शंकररावांनी लागलीच ओळखलं, पण या प्रसंगाने देखील ते डगमगले नाहीत. त्यांनी धरण पुएन बांधूनच दाखवलं. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना धरणाच्या  उदघाटनाला बोलावलं आणि जेव्हा १९७६ मध्ये धरण पूर्ण झालं. तेव्हा त्यांनी इंदिरा गांधी यांना देखील लोकार्पण सोहळ्याला आमंत्रित केलं.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.