राऊत आणि मलिक यांना रोज उठुन कुत्र्यासारखा भुंकणासाठी शाहरुखने भाड्याने घेतलं असावं..!

0

सध्या देशातला सगळ्यात चर्चित मुद्दा म्हणजे आर्यन खान ची वाढती पोलीस कस्टडी आणि ड्रग्ज प्रकरण आहे.बॉलिवूड चा किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं तो लोकप्रिय प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या एनसीबीने केलेल्या कारवाईनंतर पोलीस कोठडीत आहे.

त्याच्या अटकेवर,एनसीबीच्या छाप्यावर संशय घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही कारवाई करण्यामागे राजकीय सूडबुद्धीने घेत असल्याचं मत व्यक्त केलं आहे.खरंतर या प्रकरणात महाविकास आघाडीने आर्यन खानला दिलेल्या पाठिंब्यावरुन विरोधी पक्ष भाजपने महाविकास आघाडीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

यावर भाजपचे आमदार नितेश राणेंनी नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर तिखट शब्दात टीका केली आहे.खासदार संजय राऊत आणि नवाब मलिक यांना शाहरुख खानने कॉन्ट्रॅक्टवर घेतलं असेल. शाहरुख खानने मलिक आणि राऊत रोज उठून कुत्र्यासारखं भुंकण्यासाठी 6 महिन्यांसाठी भाड्याने घेतलं असेल. रोज कुत्र्यासारखं भुंकण्याची जबाबदारी त्यांना दिली असेल.

म्हणून पगारावर चालणाऱ्या लोकांसारखे चालतात, अशा तिखट शब्दात नितेश राणेंनी नवाब मलिक आणि संजय राऊतांवर प्रखर टीका केली आहे.खासदार संजय राऊत हल्ली कुठल्या प्रतीचा गांजा घेतात हे विचारा. कारण दिवसेंदिवस ते नशेतच दिसतात. म्हणून त्यांच्यावर कमी बोलणं बरं. गांजाडी लोकांवर किती बोललं पाहिजे हे आता आम्ही लोकप्रतिनिधींनी ठरवलं पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या आर्यन खानसाठी जेवढं नवाब मलिक बोलतात. महाविकास आघाडीतील नेते बोलतात मग तेवढंच आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी का बोलत नाहीत. तेवढंच पीक विमा कंपन्यांच्या विरोधात का बोलत नाहीत?

आर्यन खान आहे म्हणून बोलतात.दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसाठी का बोलले नाहीत? तो हिंदू होता म्हणून?खरंतर या सर्व गोष्टी एकाच दिशेने सुरु आहेत. तो खान आहे म्हणून एवढं प्रेम दाखवतात. सामान्य तरुण तरुणींवर का प्रेम दाखवत नाही?,

असा प्रखर सवालही नितेश राणेंनी यावेळी उपस्थित आहे.जोरदार टिकेनंतर आता संजय राऊत आणि नवाब मलिक यांची या टिकेवर काय प्रतिक्रिया असेल यांवर मात्र सगळ्यांच लक्ष वेधून आहे.खरंतर नितेश राणे नेहमीच त्यांच्या बेधडक टिकेसाठी चर्चेत असतात,यावेळी त्यांनी मात्र महाविकास आघाडी च्या ह्या नेत्यांना चांगलंच धारेवर धरल्याच चित्र बघायला मिळत आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.