शहा- पवार भेट झालीच नाही! – संजय राऊत

0

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कथित भेटीचे पडसाद सोमवारीही उमटत राहिले.या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीवरून राज्यातील नेत्यांकडून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी तर शेवटी ही भेट झालीच नसल्याचा दावा करत यासंदर्भातील अफवांची धुळवड थांबवा, असे विधान केले.

गृहमंत्री शहा यांची शरद पवार यांनी अहमदाबादेत भेट घेतल्याची चर्चा रविवारी सुरू झाली. त्यातच सर्वच बाबी सार्वजनिक करायच्या नसतात, अशी गुगली शहा यांनी टाकल्याने महाविकास आघाडीच्या गोटात भेटीवरून तर्कवितर्क लढविले जाऊ लागले होते. यावर, संजय राऊत यांनी सुरुवातीला अशा भेटी होतच राहतात, असे सांगत भेटीमागे फारसे राजकारण नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली असली तरी त्यात गैर काय आहे, असा प्रश्न करतानाच अमित शहांना आम्हीही भेटू शकतो. ते देशाचे गृहमंत्री आहेत. शिवाय, दिल्लीप्रमाणे आपले गृह
शहर असलेल्या अहमदाबादेतही ते अनेकांना भेटी देत असतात, असे राऊत म्हणाले. तर, भेटीवरील अमित शहांच्या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले की, अशा बातम्या सार्वजनिक करता येत नाहीत असे अमित शहा म्हणाले. पण, गुप्त काहीच राहत नसते, बंद खोलीतील चर्चाही गुप्त राहत नाही, त्याही सार्वजनिक होतात.

यानंतर सायंकाळी मात्र राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शहा- पवार भेट झालीच नसल्याचा दावा केला. ‘मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजिबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही, असे राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.