नालेसफाई न झाल्याने सेनेच्या आमदाराने बीएमसीच्या कंत्राटदाराला बसवलं नाल्यात, टाकला अंगावर कचरा!

0

मुंबईमध्ये नालेसफाई वरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलेच राजकारण पेटले आहे. विरोधकांनी शिवसेना नालेसफाईच्या मुद्द्यावरून चांगलेच कोंडीत पकडले आहे. नालेसफाईवरून वाद सुरू असताना शिवसेनेचे चांदीवलीचे आमदार दिलीप लांडे यांनी पालिकेच्या नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदाराला चक्क नाल्यात बसवून अंगावर कचरा टाकला. याचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

शिवसेनेच्या आमदाराने नागरिकांनी तक्रार केल्याच्या नंतर चांदीवली मधील संजय नगर भागात मोठ्या प्रमाणात नाले तुंबलेल्या ठिकाणी भेट दिली. सोबतच शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा होते. आणि ही नालेसफाई सुरु केली. मात्र या नालेसफाईचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिले होते, त्याला त्या ठिकाणी बोलावून आमदारांनी चक्क त्याच नाल्याच्या कचऱ्यात बसवले.

लोकांना होत असलेला त्रास कंत्राटदाराच्या लक्षात यावा म्हणून हे कृत्य आमदारांनी केल्याचे सांगितले. कचऱ्यात बसवलेला व्हिडिओ सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.