बांगलादेशमधील हिंदू लोकांच्या च्या जळत्या घराचा फोटॊ बघून त्या क्रिकेटपटू ने केली जगात खळबळ माजवणारी पोस्ट.!

0

बांगलादेश मध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा जगभरातून निषेध होत आहे,खरंतर हिंदू लोकांची घर जाळून धार्मिक द्वेष वाढवण्याचा हा कट नेमका कोणत्या कारणासाठी रचला जातोय, याचं अद्यापही कारण स्पष्ट झालं नाही.हल्ली बांगलादेश दोन गोष्टींसाठी चर्चेचा कारण ठरतं आहे.

पहिला कारण म्हणजे अनपेक्षितपणे टी २० विश्वचषकाच्या पात्रता फेरीत स्कॉटलंडकडून झालेल्या पराभवामुळे आणि दुसरा या देशामध्ये सुरु असणाऱ्या हिंसाचारामुळे.ह्या दोन गोष्टींची समीकरण जुळवून बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मुशरफ मुर्तझाने सध्या मायदेशामध्ये सुरु असणाऱ्या हिंसेचा निषेध केला आहे.

हिंदू अल्पसंख्यांकांवर होणारे हल्ले हे अत्यंत निंदनीय असल्याचं मुर्तझाने म्हटलं आहे.मूर्तझाने बंगाली भाषेमध्ये त्याच्या फेसबुक पेजवर एका फोटोसहीत त्याचा मत आणि निषेध व्यक्त केलंय. बांगलादेशचा दोनदा पराभाव झालाय. एक टी २० विश्वचषकाच्या पात्रता फेरीत स्कॉटलंडने पराभूत केलं तेव्हा आणि एक पराभव घरी (मायदेशी) झालाय, असं मुर्तझाने पोस्ट मध्ये लिहिलं आहे.

रविवारी बांगलादेशमधील रंगपूरमध्ये झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर त्याने या हिंसेमध्ये जाळण्यात आलेल्या घरांचा फोटो पोस्ट करत दुःख व्यक्त केलीय. या हल्ल्यात हिंदूंची २० घरं जमावाने जाळून टाकली.हा खेळाडू म्हणतो की काल आमचा दोन वेळा पराभव झाला.

एक बांगलादेश क्रिकेट संघाचा पराभव झाला जो फार वेदनादायी होता. दुसरा पराभव हा बांगलादेशचाच झाला ज्यामुळे माझ्या काळजाला छेद गेलाय. हा तो हिरवा आणि लाल झेंडा (बांगलादेशचा राष्ट्रीय ध्वज) नाही जो आपल्याला हवाय.

किती सारी स्वप्नं, किती सारे कष्टाने मिळवलेले विजय एका क्षणात नाहीसे झाले. अल्लाह आपल्याला यामधून मार्ग दाखवो हीच इच्छा,” असं मुर्तझाने दुःख व्यक्त करत त्याचे मत व्यक्त केले.खरंतर गेल्या दोन आठवड्यांपासून बांगलादेशमधील वेगवेगळ्या भागांमधून हिंदूविरोधातील हिंसेच्या अनेक घटना समोर येत आहेत.

खूप ठिकाणी हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आल्याच्या लाजिरवण्या घटनाही घडल्यात. रविवारी येथील रांगपूर जिल्ह्यामधील हिंदूंच्या वस्तीमधील ६६ घरांवर जमावाने हल्ला करुन त्यापैकी २० घरं पेटवून दिली. मागील आठवड्यामध्ये नानूअर दिघी तलावाजवळ नवरात्रीनिमित्त,

दुर्गेची प्रतिष्ठापना केलेल्या मंडपामध्ये तीन जणांची हत्या करण्यात आली.एवढी मोठी धार्मिक द्वेष बांगलादेश मध्ये नेमकं कोणत्या कारणाने निर्माण झाला हा जागतिक चर्चेचा विषय बनला आहे.खरंतर अल्पसंख्याक हिंदूंवर होणार हा अन्याय अजून किती दिवस असाच रौद्ररूप धारण करेल की कधितरी थांबेल, हा चिंतेचा प्रश्न आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.