ते दृश्य पाहून शरमेनं मान खाली गेली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

दोन दिवसाच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर आज संध्याकाळी पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षावरती चांगलाच घणाघात केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहामध्ये झालेल्या धक्काबुक्की आणि आक्षेपार्ह शब्द वापरले गेले यावर त्यांनी चांगलेच विरोधकांना फैलावर घेतले. उद्धव ठाकरे म्हणाले की “महाराष्ट्राच्या परंपरेला असं घडलं नाही. कामगिरी खालावण्याकडे कल आहे. काल जे दृश्य पाहायला मिळालं, ते दृश्य पाहून शरमेनं मान खाली गेली,” असं ठाकरे म्हणाले.

तसेच पुढे बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले “जबाबदार पक्षाकडून असं कृत्य. हे आम्ही घडवलेलं नव्हतं. बाळासाहेब थोरात यांच्या 37 वर्षांच्या कारकार्दीत असा अनुभव पहिल्यांदाच आला तर मला पहिल्या टर्ममध्येच असा अनुभव आला,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

विधिमंडळामध्ये जो काही प्रकार झाला तो निश्चितच आक्षेपार्ह नकार होता महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावण्याचा प्रकार या ठिकाणी झाला या गोष्टीवर ती महाराष्ट्र भरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.