मी जिवंत आहे बघा – नरहरी झिरवाळ

0

विधानसभा उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ सध्या आदिवासींना जनजागृतीच्या दृष्टीने साद घालत असताना दिसून येत आहेत. आदिवासी भागात लसीच्या बाबतीत अज्ञान आहे. आदिवासी भागात सुद्धा कोरोना फारच जोमाने पसरतो आहे. याची दखल घेत वैद्यकिय सुविधा मिळाव्यात, व्यवस्थित उचार व्हावेत म्हणून विधानसभा उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ यांनी पाठपुरावा केला आहे. सातत्याने ते परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

आजारी पडल्यावर उपचार घेण्यासाठी आदिवासी घरातून बाहेर पडत नाही. त्यांच्या मना मध्ये उपचाराच्या बाबतीत काही गैरसमज निर्माण झाले आहेत. या गोष्टीची सखोल माहिती घेतली असता नरहरी झिरवाळ यांच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ” दवाखान्यात गेल्यावर ‘पॉझिटिव्ह’ काढतात, मग लस देतात, मग माणूस मरुन जातो, असा गैरसमज आदिवासी मध्ये मोठ्या संख्येने निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीच्या सदस्य, सरपंच अशा प्रमुख लोकांना लस सर्वप्रथम दिली. आता इतरही आदिवासी लस घेण्यास येऊ लागले आहेत.

इतकेच नव्हे तर दुसरी कोरोना प्रतिबंधाची लस घेतली की, माणूस मरतो अशी समजूत लोकांत निर्माण झाली आहे. यावर तोडगा काढत नरहरी झिरवाळ म्हणाले “मी दोनदा लस घेतली अन मी जिवंत आहे बघा” असे सांगून त्यांनी आदिवासींचा आत्मविश्‍वास वाढवला आहे!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.