
उद्यापासून राज्यात कोरोनाची ब्रेक द चेन कलम 144 लागू
उद्यापासून राज्यात संचारबंदी लागू झाली असून,सकाळी 7ते 8संध्याकाळी अत्यावशक सेवा जसे किराणा दूध सुरू राहणार आहेत.
राज्यात बर्याच अत्यावश्यक सेवा बजावणार्या लोकांना सार्वजनिक वाहतूक गरजेची असल्याने बस,लोकल सुरू राहणार.दवाखाने,मेडिकलदुकान,विमा सेवा जनावरांचा दवाखाना,बँक,दूरसंचार,पत्रकार,पेट्रोल डिझेलपंप इ सुरू राहणार आहे.बांधकाम कर्मचार्यांची सोय बिल्डरनी साईटजवळच करावी व काम सुरू ठेवाव.
विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही.हॉटेल,रेस्टोरंट,बार बंद राहतील परंतु पार्सल देता येईल.गरिबांचा विचार करता त्यांची तरतूद म्हणून अन्नसुरक्षा या योजनेतंर्गत 3 किलो गहू दोन किलो तांदूळ महिना नोंदीत 7 कोटी गरिबांना देण्यात येतील.
याबरोबरच शिवभोजन थाळी जी 10 रुपये ताट होती ती पुढचा महिनाभर मोफत देण्यात येईल.नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 1500 रुपये,घरेलू कामगार यांनाही मदत,नोंदीत फेरीवाल्यांना 1500 रुपये रिक्षाचालकांनाही 1500 रुपये मदत केली जाईल.
राज्यात आलेल्या कोविड महामारीवरील उपाययोजनांसाठी 3300 कोटी तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान राज्यात लसीकरण व इतर बाबतीतील माहिती उद्या सकाळपर्यंत जाहीर करण्यात येईल.राज्यात 8 नंतर सर्व बंद राहील.दवाखाने,मेडिकल दुकाने आणि वैद्यकीय सेवेशी निगडित अस्थापना सुरू राहतील.