करोडोची संपत्ती असूनही सयाजी शिंदे जगतात इतकं साधं आयुष्य, तुम्हालाही वाचून धक्का बसेल…!

0

अनेक चित्रपटात ज्यांनी खलनायकाची भूमिका केली ते खऱ्या आयुष्यात मात्र खरे नायक आहेत.स्वतःच्या अद्भुत आणि बेधडक अभिनयाने रसिकांची मने ज्यांनी जिंकली आहेत. मराठी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, गुजराती, हिंदी चित्रपट आणि अनेक मराठी नाटकांत काम केले आहे.

हिंदी, मराठीतच नाही तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.  एक उत्तम अभिनेता तर आहेच पण उत्तम माणूस असणारा सर्वोत्कृष्ट मराठी अभिनेता सयाजी शिंदे. कोट्यवधी संपत्तिचा मालक असताना सुद्धा हा माणूस इतका साधं आयुष्य जगतो, बघून तुम्हालासुद्धा विश्वास होणार नाही.

आज करोडोंची संपत्ती असणाऱ्या  सयाजी शिंदे यांचे पाय मात्र आजही जमिनीवरच आहेत ,ही वस्तुस्थिती आहे. त्यांचे राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे.आजही सामान्य आयुष्य जसं आयुष्य जगतो त्याच पद्धतीने हा माणूसही आयुष्य जगतो तेही खूप साधेपणाने!

खरंतर सयाजी शिंदे नेहमी एक गोष्ट सांगतात, कितीही पैसा आणि सुखसोयी असल्या तरी माणसाला शांती आणि समाधान हवे असते ते विकत मिळत नाही. पण झाडाखाली बसला तर या दोन्ही गोष्टी मिळतात. कोट्यवधी रुपयांच्या गाडीत बसल्यानंतरही जेव्हा गाडीबाहेर उतरतो, त्यावेळी आपण गाडीही झाडाखाली लावायला सांगतो. मग पैसा महत्त्वाचा की झाड?

त्यांची ही गोष्ट खरंतर किती दूरदर्शी आहे,खरंतर प्रत्येक ठिकाणी पैसा हा कामी येतच नसतो,असंच त्यांचं परखड मत असते.सयाजी शिंदे यांचं झाडांवरील प्रेम खरंतर अतुलनीय आहे. यापूर्वीही त्यांनी वृक्ष लागवडीबाबत अनेक उपक्रम घेतले आहेत.

झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत व प्रत्येक गाव, तालुक्यातील सर्वात जुनी झाडे हेच त्या त्या भागातील आपले सेलिब्रेटी आहेत,अशी गोड भावना त्यांना या समाजात रुजू करायची आहे.जगातआईनंतर वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देऊन जगवतात,

त्यामुळे आपण सर्वांनी प्रत्येकी पाच झाडे तरी लावून वाढवली पाहिजेत अनेक कार्यक्रमातून सयाजी शिंदे झाडाचं महत्त्व पटवून देताना दिसतात.माणुस कितीही आकाशात भरारी घेत असला तरी आकाशात आम्ही घर बांधू शकत नाही,त्यासाठी पाय जमिनीवर आणावेच लागतात,ही वस्तुस्थिती आहे.

मुळात साधेपणा हाच माणसाचा मोठेपणा असतो हा जणू संदेशच त्यांच्या राहणीमानातून येणाऱ्या तरुण पिढीला मिळत आहे.जग आधुनिक झालं खरं पण त्यात माणूसकी आणि आपली विचारसरणी ही आधुनिक होता कामा नये, कारण माणूसच माणसाच्या उपयोगी येत असतो ही वस्तुस्थिती आहे.सयाजी शिंदे सारखा अमूल्य विचारांचा वारसा असणारा अभिनेता आणि माणूस पुन्हा होणे शक्य नाही..!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.